प्रॉपर्टी शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणारे सर्वात प्रभावी जाहिरात माध्यम

आपली जाहिरात आजच पब्लिश करा

एक महिना प्रसिद्धी

अधिक काळ प्रसिद्धी म्हणजे आपली जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल आणि अधिक प्रतिसाद मिळेल.

दोन लाख सर्क्युलेशन

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील दोन लाख नागरिकांपर्यंत दररोज पोचणाऱ्या जाहिराती.

टार्गेटेड जाहिराती

प्रॉपर्टी खरेदी विक्री, भाड्याने देणे घेणे यामध्ये इंटरेस्ट असलेल्या नागरिकांपर्यंत पोचणाऱ्या टार्गेटेड जाहिराती.

थेट संपर्क

जाहिरातींमध्येच फोन नंबर असल्याने इंटरेस्टेड पार्टीज कोणत्याही फिल्टरिंगशिवाय थेट संपर्क साधतील.

FAQs

प्रॉपर्टी खरेदी विक्री तसेच भाड्याने देणे घेणे या मध्ये इंटरेस्ट असलेल्या पुणेकरांपर्यंत नेमकेपणाने पोचण्यासाठी आम्ही प्रोफेशनल डिजिटल मार्केटिंग तंत्रज्ञानाचा वापर करतो. यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल यांवर पेड जाहिरातींचे कॅम्पेन दररोज चालवले जाते. हे ऑनलाईन डायनॅमिक कॅम्पेन असल्यामुळे दररोज वेगवेगळ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत MegaPune ची जाहिरात सेवा पोचवली जाते.

MegaPune हा ‘ओपन’ जाहिरातींचा प्लॅटफॉर्म आहे. जाहिरातदारांना आपल्या फोन नंबरसह जाहिराती पब्लिश करता येणे आणि त्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असलेल्याना रजिस्ट्रेशनशिवाय तसेच कोणत्याही अटी-शर्तींशिवाय जाहिरातदारांशी संपर्क साधता येणे हे  MegaPune चे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. जाहिरातदारांचा मोबाईल नंबर पाहण्यासाठी इथे कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन करावे लागत नाही. वेबसाईटचा वापर करण्यासाठी युजरचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अशी कोणतीही वैयक्तिक माहिती आम्ही मागत नाही त्यामुळे असा डेटा जमा करण्याची कोणतीही यंत्रणा  MegaPune वर कार्यरत नाही.

न्यूजपेपरमधील जाहिराती ‘पर डे बेसिस’ वर पब्लिश केल्या जातात. त्या बऱ्याच महाग असतात. त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीचे फोटोज पब्लिश करता येत नाहीत. प्रॉपर्टी डिटेल्स देण्यासाठी शब्दसंख्येची मर्यादा असते. तसेच एका पेपरमध्ये दिलेली जाहिरात दुसऱ्या पेपरच्या वाचकापर्यंत पोचत नाही. या उलट MegaPune वरील जाहिराती एक महिना कालावधीसाठी पब्लिश केल्या जातात. प्रॉपर्टीचे सर्व डिटेल्स फोटोजसह त्यामध्ये देता येतात आणि त्या सर्वांना मोबाइल फोनवर, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर कुठेही, केंव्हाही पाहता येतात.

२०२३ साली फेसबुक पोस्ट्सचा organic reach हा केवळ एक ते पाच टक्क्यांच्या आसपास होता असे जगातील दिग्गज मार्केटिंग कंपन्यांच्या अभ्यासातून दिसून आले आहे. म्हणजेच आपल्याला अपेक्षित असलेल्या फक्त एक ते पाच टक्के लोकांपर्यंत आपली बिझनेस पोस्ट पोचत आहे.  संदर्भ-1 , संदर्भ-2 यामागे प्रामुख्याने फेसबुकची कार्यपद्धती आणि त्यांचे व्यावसायिक धोरण कारणीभूत आहे. त्यामुळे फेसबुक ग्रुपमध्ये केलेल्या व्यावसायिक पोस्ट्स फार कमी लोकांपर्यंत पोचतात आणि त्यांना अतिशय कमी प्रतिसाद मिळतो असा युजर्सचा अनुभव आहे. पण असे का होते? याचे सविस्तर उत्तर पुढे दिले आहे.   

ग्रुप पोस्ट सर्वाना का दाखवल्या जात नाहीत?
कल्पना करा की तुम्हाला प्रॉपर्टी भाड्याने द्यायची आहे अथवा विक्री करायची आहे आणि यासाठी तुम्ही प्रॉपर्टीविषयक दहा फेसबुक ग्रुप्समध्ये त्याची पोस्ट फोटोजसह पब्लिश केली आहे. या दहा ग्रुप्सची एकूण सदस्यसंख्या पाच लाख आहे. यामुळे तुम्हाला असे वाटू शकते की आपली पोस्ट आता पाच लाख लोकांपर्यंत जाईल. मात्र फेसबुकची यंत्रणा (Facebook algorithm) अशा पद्धतीने काम करत नाही. फेसबुक ग्रुप्समध्ये पब्लिश केलेली पोस्ट सर्व ग्रुप मेम्बर्सना दाखवली जात नाही तर अगदी मोजक्या लोकांनाच दाखवली जाते हे वास्तव आहे. हे वास्तव सर्वसामान्य युजरला माहित नसते पण याचा पडताळा तुम्ही स्वतः सहजपणे घेऊ शकता. यासाठी आता उलट विचार करा. आता अशी कल्पना करा की तुम्ही आता पोस्ट पब्लिश करणारे नाही तर पोस्ट्स वाचणारे एक युजर आहात. तुम्हीपण वेगवेगळ्या दहा फेसबुक ग्रुप्सचे मेम्बर आहात आणि या दहा ग्रुप्सची एकूण सदस्यसंख्या पाच लाख आहे. आपण असे गृहीत धरू की या ग्रुप्समध्ये पाच लाख लोकांपैकी फक्त एक टक्का म्हणजे पाच हजार लोक या ग्रुप्समध्ये दररोज व्यावसायिक जाहिराती पोस्ट करत असतात. वास्तविक बिझनेस ग्रुप्समध्ये दररोज बिझनेस पोस्ट करणाऱ्यांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असते तरीही आपण इथे उदाहरणासाठी फक्त एक टक्का हे प्रमाण गृहीत धरू. या एक टक्का म्हणजे पाच हजार लोकांनी पब्लिश केलेल्या पाच हजार जाहिराती तुम्हाला दररोज दाखवल्या जात आहेत अशी कल्पना करा. अशा वेळी तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही नक्कीच वैतागून जाल. ग्रुपमध्ये असलेल्या मेम्बर्सनी केलेल्या वस्तूंच्या, सेवांच्या जाहिराती तुम्हाला एका पाठोपाठ दिसू लागल्या तर तुम्ही खरोखर वैतागून जाल. फेसबुकचा वापर आपण दिवसातून जास्तीतजास्त दोन तास करतो असे गृहीत धरले तर एका तासात अडीच हजार म्हणजे मिनिटाला चाळीस पोस्ट्स अर्थात दीड सेकंदाला एक बिझनेस पोस्ट तुम्हाला पाहावी लागेल. यामुळे फेसबुक ओपन केल्यानंतर तुम्हाला ग्रुप मध्ये पोस्ट केलेल्या जाहिरातीच प्रचंड संख्येने दिसतील. फेसबुकचा वापर तुम्ही यासाठी नक्कीच करत नाही. 

फेसबुकचा वापर लोक कशासाठी करतात? 
खरेतर फेसबुकवर आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांचे लेटेस्ट अपडेट्स पाहण्यात, त्यांनी केलेल्या पर्सनल पोस्ट्स आणि त्यांचे फोटो पाहण्यात आपल्याला जास्त इंटरेस्ट असतो. या पर्सनल कनेक्टसाठी आणि मनोरंजनासाठी आपण फेसबुक वापरतो. मात्र त्या ऐवजी तुमच्यासाठी गैरलागू आणि निरुपयोगी असलेल्या बिजनेस पोस्ट्स प्रचंड संख्येने दिसू लागल्या तर तुम्ही नक्कीच वैतागून जाल. म्हणजेच तुमचा फेसबुकवरील ‘युजर एक्स्पिरिअन्स’ आनंददायक आणि उत्साहवर्धक राहणार नाही. प्रचंड संख्येने येणाऱ्या बिझनेस पोस्ट्सना कंटाळून तुम्ही त्या ग्रुप्स मधून बाहेर पडाल, हळूहळू फेसबुक वापरणे कमी कराल किंवा कदाचित बंदही कराल. युजरसोबत असे होऊ शकते याची फेसबुकला पूर्ण कल्पना आहे पण त्यांना असे होऊ द्यायचे नाही. फेसबुकला आपल्या युजर्सची संख्या वाढतीच ठेवायची आहे आणि त्यांना ‘एन्गेज’ सुद्धा ठेवायचे आहे. हे साध्य करण्यासाठी आणि युजर्सची एंगेजमेंट वाढवण्यासाठी ‘ग्रुप पोस्ट डिलिव्हरी’ वर फेसबुकने स्वतःच नियंत्रण आणले आहे. मात्र कोणाला कोणत्या आणि किती ग्रुप पोस्ट्स दाखवायच्या याविषयीचे धोरण फेसबुकने उघड केलेले नाही. मात्र थोडा बारकाईने विचार केला तर फेसबुक ग्रुप मधील सर्व पोस्ट सर्वांना दाखवल्या जात नाहीत ही बाब सहज पटेल.

फेसबुकचे व्यावसायिक धोरण.
“फेसबुकचा वापर मित्र-मैत्रिणींच्या, समविचारी लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी करा आणि प्रभावी पद्धतीने व्यावसायिक जाहिराती करण्यासाठी फेसबुक वरील ‘Sponsored Posts’ चा वापर करा म्हणजेच पैसे देऊन जाहिरात करा.” हे फेसबुकचे अधिकृत धोरण आहे. पैसे देऊन केलेल्या जाहिराती मधून मिळणारा महसूल हेच फेसबुकचे उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन आहे. बिझनेस ग्रुपमधील सर्व फ्री पोस्ट्स सर्वाना दाखवल्या जाऊ लागल्या तर मग फेसबुकवर पैसे देऊन जाहिरात कोण आणि कशासाठी करेल? फेसबुकचे ‘बिझनेस मॉडेल’ त्यामुळे धोक्यात येईल. हे टाळण्यासाठी व्यावसायिकांनी पैसे देऊन फेसबुकवर जाहिराती कराव्यात यासाठी फेसबुक वेगवेगळे मार्ग अवलंबत आहे. ‘ग्रुप पोस्ट डिलिव्हरी’ च्या संख्येवरील वरिल नियंत्रण हा त्यांच्या उत्पन्नवाढीच्या आणि ‘better user experience’ धोरणाचा एक भाग आहे. 

असे असेल तर मग फेसबुक ग्रुप्स कशासाठी आहेत?
फेसबुकला आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखतो पण ही खऱ्या अर्थाने जाहिरात कंपनी आहे. आपल्या युजर्सना व्यावसायिकांच्या Sponsered Posts अर्थात जाहिराती दाखवून उत्पन्न मिळवणे हा फेसबुकचा प्रमुख व्यवसाय आहे. यासाठी आपल्या युजर्सना कोणकोणत्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस घेण्यात स्वारस्य आहे हे जाणून घेणे फेसबुकसाठी आवश्यक आहे. युजरचा interest आणि त्याचे फेसबुकवरचे behaviour यांच्या आधारे त्या-त्या विषयाच्या जाहिराती युजर्सना दाखवल्या जातात. हा interest अचूकपणे जाणून घेण्यासाठी फेसबुकने एक व्यापक यंत्रणा उभी केली आहे. यात फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील पेजेस, ग्रुप्स, मार्केट प्लेसेस, व्हिडीओज, रिल्स, स्टोरीज, मेसेंजर, लाईक्स, पोस्ट शेअरिंग, पर्सनल पोस्ट्स, पर्सनल प्रोफाईल्स, व्हाट्सऍप बिझनेस अकाउंट्स, व्हाट्सऍप ग्रुप्स, अशा अनेक सर्व्हिसेस आणि त्यातील फीचर्सचा समावेश आहे. या सर्व्हिसेस आणि फीचर्सचा जास्तीतजास्त वापर करायला लावून युजर्सचा इंटरेस्ट अलगदपणे आणि अचूकपणे जाणून घेण्यासाठी फेसबुकची मालकी असलेल्या ‘मेटा’ या कंपनीने विकसित केलेली ही अवाढव्य ‘डेटा कलेक्शन’ यंत्रणा आहे. फेसबुक नेटवर्कची संपूर्ण अर्थव्यवस्था “user interest and behaviour” मधून मिळणाऱ्या डेटावर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रुप मेम्बर्सचा व्यवसाय वाढवण्यात, तुमच्या प्रॉपर्टीला ग्राहक शोधून देण्यात फेसबुकला स्वारस्य नाही तर त्या ग्रुप मधील हजारो-लाखो युजर्सचा रिअल इस्टेट, प्रॉपर्टी यामध्ये असलेला इंटरेस्ट एकगठ्ठा जाणून घेण्यात आहे. याचा वापर करून युजर्सना रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स, डेव्हलपर्स, रिअल इस्टेट पोर्टल्स यांच्या जाहिराती दाखवल्या जातात. फेसबुकसाठी ग्रुप्सचा मुख्य उद्देश हा आहे. मात्र प्रोफेशनल सोशल मीडिया मार्केटिंग कशा पद्धतीने काम करते याची पुरेशी माहिती सर्वसामान्य फेसबुक युजर्सना नसते. त्यामुळे ते बिझनेस प्रमोशनसाठी फक्त ग्रुप पोस्ट्स वरच अवलंबून राहतात. पण फेसबुक पोस्ट्सचा organic reach अत्यल्प असल्यामुळे एखाद्या ग्रुप मध्ये पन्नास हजार, एक लाख मेम्बर्स असूनही आपल्या पोस्टला अपेक्षित रिस्पॉन्स का मिळत नाही याचे कारण फेसबुकच्या या कार्यपद्धतीमध्ये आहे. 

यावर उपाय काय ?  
फेसबुकने विकसित केलेल्या यंत्रणेचा वापर करून संभाव्य ग्राहकापर्यंत पोचण्यासाठी फेसबुकवर पैसे देऊन जाहिराती करणे हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे. मात्र प्रत्येकाला स्वतः फेसबुकवर ‘पेड कॅम्पेन’ चालवणे शक्य नसते. यासाठी डिजिटल मार्केटिंग मधील शास्त्रशुद्ध ज्ञान, अनुभव आवश्यक असते. शिवाय ही मोठी  खर्चिक बाब असते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे megapune.com ही प्रॉपर्टीविषयक जाहिरात सेवा आहे. इथे आपल्याला फोन नंबरसह आपली प्रॉपर्टीविषयक जाहिरात करता येते. ज्यांना आपल्या जाहिरातीमध्ये स्वारस्य आहे ते रजिस्ट्रेशन आणि अटी-शर्ती शिवाय थेट आपल्याला फोन करू शकतात.         

फ्री पब्लिशिंग ऑफर मर्यादित काळासाठी आहे. त्यांनतर असलेले पब्लिशिंग चार्जेस सुद्धा किफायतशीर असणार आहेत.  

प्रॉपर्टी सर्च करा आणि जाहिरातदारांशी थेट संपर्क साधा